April 19, 2025

छावण्या आणि पाण्याचे नियोजन आत्ताच करा
बदामराव पंडितांच्या नवनिर्वाचित सरपंचांना सूचना

शिवसेनेच्या सरपंच व ग्रा पं सदस्यांचा सत्कार संपन्न

 

गेवराई दि 10 ( वार्ताहार  ) गेवराई तालुक्यासह मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे जनावरांच्या चाऱ्याचा आणि ग्रामस्थांना प्यायच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो त्यासाठी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी जनावरांच्या छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन आत्तापासूनच करावे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून शासनाकडेही तसे प्रस्ताव तात्काळ पाठवावेत असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.

शिवसेनेच्या गेवराई तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा दिनांक 9 नोव्हेंबर रोजी जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी श्री पंडित बोलत होते. या सत्कार सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिवसेना जिल्हा समन्वयक माजी सभापती युद्धाजित पंडित, युवा नेते यशराज पंडित, तालुकाप्रमुख कालिदास नवले, गोविंद जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यातील 33 ग्रामपंचायती पैकी 17 ग्रामपंचायत मध्ये शिवसैनिक सत्ताधारी म्हणून त्या ठिकाणी काम पाहणार आहेत. अशा स्थितीत गावातील प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घ्या. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा. यावर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावातली माणसं आणि जनावरही जगली पाहिजेत यासाठी आजपासूनच नियोजन करावे. दुष्काळी स्थितीचा अभ्यास करून चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन करून, बदामराव पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला लोकांनी भरभरून प्रेम देत ग्रामपंचायत निवडणुकीत पसंती दिल्याचे म्हटले.

त्यासोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीतही जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहेत असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदामराव पंडित यांची गेवराई विधानसभा मतदारसंघात उमेदवारी फायनल केली आहे. महविकास आघाडी झाली तरी आणि स्वतंत्र लढले तरी बदामराव पंडित हेच गेवराईतून शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार असतील. त्यामुळे सर्वांनीच नियोजनबद्ध कामाला लागावे असे आवाहन केले. बदामराव आबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात मोठ्या संख्येने ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आले आहेत. परंतु विरोधक दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसार माध्यमात फिरवत आहेत, त्याला जनता थारा देत नाही असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रवक्ते दिनकर शिंदे यांनी केले.

याप्रसंगी राहेरी, उमापूर, भेंडटाकळी, तळवट बोरगाव, आगर नांदूर, भेंड खुर्द, सुलतानपूर, रोहितळ, रामपुरी, पिंपळगाव कानडा, तळवट बोरगाव, कांबी मांजरा, नंदपुर, काठोडा, वाहेगाव आदींसह विविध गावचे सरपंच जगदीश अंकुशराव मस्के, समृद्धी मुकुंद बाबर, अलका नंदकुमार गाडे, गोपीनाथ भीमराव फलके, आश्विनी धनेश्वर खेत्रे, श्रीराम लक्ष्मणराव काळे, श्रीराम अशोक उबाळे, नंदकुमार काशिनाथ गाडे, निर्मलाबाई संभाजीराव आहेर आणि ग्रामपंचायत सदस्यांचा गळ्यात भगवे रुमाल घालून बदामराव पंडित, अनिल जगताप, युद्धाजित पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान पिंपळगाव कानडा येथील सरपंच सुमित्राबाई गणपत धापसे यांचा अनुरूपाताई युद्धाजित पंडित यांनी सत्कार केला. कार्यक्रमास बंडू आप्पा घोलप, अजय औटी, किरण आहेर, महादेव खेत्रे, शेख फक्त मामू, काशिनाथ आडगळे, दीपक रडे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *