चऱ्हाटा फाट्यावर पत्याच्या क्लबवर छापा;सतरा जण ताब्यात 

पंकज कुमावत यांची कार्यवाई

बीड दि 10 ( वार्ताहार ) सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांची बीड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पत्त्याच्या क्लब वर धाड 17 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेसह एकूण 25 आरोपी वर गुन्हा दाखल करुन एकूण किमती 11,80,050/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की, मा. पंकज कुमावत साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की चऱ्हाटा फाटा ता.जि. बीड येथे तुकाराम नगरच्या पाठीमागे तांदळे यांच्या शेडमध्ये काही इसम अंदर बाहर नावाचा जुगार पत्त्याच्या पानावर पैसे लावून खेळत आहेत, अशी माहिती मिळाल्याने स्वतः पंकज कुमावत साहेब यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे सह सदर ठिकाणी दिनांक 09/11/2023 रोजी 19.30 वाजता रेड करुन 17 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेसह एकूण 25 आरोपी वर गुन्हा दाखल करुन नमूद आरोपी कडून एकूण किमती 11,80,050 किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण 25 आरोपी विरुद्ध पोलीस नाईक दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतः  पंकज कुमावत साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बाबासाहेब डापकर, दिलीप गीते, अनिल मंदे, भरत शेळके, गोविंद मुंडे, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा तसेच आरसीपी बीड येथील राठोड, जाधव, खेडकर, धनवे व पवार यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *