मराठा आंदोलक आक्रमक गेवराई तहसिल कार्यलय केेले बंद

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत तहसिलदार यांच्या दालनासमोर आंदोलन सुरू 

गेवराई दि 30 ( वार्ताहार ) मराठा आरक्षण प्रश्न पेटला असुन मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू असनाऱ्या उपोषणाचा पाचवा दिवस असुन त्यांची प्रकृती खालावली आहे याची दखल राज्य शासन घेत नाही म्हणून राज्यातला मराठा आक्रमक झाला आहे त्याच पार्श्वभूमिवर आज ( दि 30 रोजी ) मराठा आंदोलक यांनी गेवराई तहसिलवर जनअक्रोश काढला व गेवराईचे तहसिल कार्यलय बंद केले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेल्या महिन्यात मनोज जंरागे यांनी अंतरवाली सराटी मध्ये तेरा दिवस अमरण उपोषण करूण सरकारला धारेवर धरले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी जाऊन चाळीस दिवसांत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण दिले जाईल.असे अश्वासन दिले होते मात्र याची पुर्तता राज्यसरकार कडून अद्याप केली नाही म्हणून मनोज जंरागे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी मध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे याचा आज पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवत चालली असल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत तसेच माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोंळूखे यांच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या बंगल्याला मराठा आंदोलकानी आग लावली तसेच याच पार्श्वभूमिवर मराठा आंदोलक महिला आणि पुरूष यांनी गेवराई तहसिल कार्यलयाचा ताबा घेऊन तहसिलदार यांच्या दालनासमोर आंदोलन सुरू केले आहे तसेच गेवराई तहसिलचे कामकाज आंदोलकाकडून बंद करण्यात आले आहे.व तहसिलदार यांच्या दालनासमोरच आंदलन सुरू केले आहे.तसेच गेवराई विधानसभेचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबद व्हिडिओ पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *