ठरलं महेश दाभाडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

गेवराई मतदार संघात त्यांची निर्णायक भूमिका ठरू शकते

 

गेवराई दि 22 ( वार्ताहार ) गेवराई नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष महेश दाभाडे यांची आ लक्ष्मण पवार यांच्या पासुन फारकत होऊन दिड ते दोन वर्षाचा कालावधी झाला आहे परंतू आता पुढे काय?असा प्रश्न अनेकांना व महेश दाभाडे यांच्या समर्थकांना पडला होता परंतू त्यातच त्यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवविनार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या परंतू ते कोणत्या पक्षात जाणार?हे मात्र स्पष्ट नव्हते परंतू आता महेश दाभाडे यांचा राष्ट्रवादीत ( शरद पवार गट ) यामध्ये प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती असुन 12 डिंसेबर रोजी पक्षाचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी महेश दाभाडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,आ लक्ष्मण पवार यांना आमदार करण्यामागे माजी नगर अध्यक्ष महेश दाभाडे यांचा खारीचा वाटा होता परंतू आ लक्ष्मण पवार यांच्या दूसऱ्या टर्ममध्ये महेश दाभाडे हे नाराज असल्याची चर्चा तर होतीच परंतू ते माजी आ अमरसिंह पंडित यांच्या गटात आपल्या सहकाऱ्यां सोबत जाणार असल्याची चर्चा संपुर्ण गेवराई शहरात होती परंतू याला महेश दाभाडे यांच्या समर्थकांचा विरोध होता म्हणून हे समिकरण जूळले नाही महेश दाभाडे यांनी कधी याविषयी आपले मतही कधी व्यक्त केले नव्हते ही फक्त अफवा असल्याचे अनेकांचे मत होते.

माजी नगर अध्यक्ष असलेले महेश दाभाडे यांना गेवराई शहरात माणनारा मोठा वर्ग आहे याला कोनीही नाकारू शकत नाही परंतू तालुक्याच्या राजकारणात ते दहा वर्षापासुन सक्रीय आहेत राजकीय डावपेचात ते परिपक्व आहेत सामान्यांच्या प्रश्नांची जान असनारा नेता अशी त्यांची ओळख आहे लहान मोठा सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना त्यांच्या जवळ सहज जाऊ शकतो आणि माणसे जोडण्याची प्रचिती त्यांच्याकडे आहे आणि हीच त्यांची बाजू विधानसभा निवडणूकीत त्यांना जमेची ठरणार आहे तसेच अनेक राजकीय जानकार त्यांना मतदान किती? होईल.यावरजरी भाष्य करीत असले परंतू महेश दाभाडे यांची विधानसभा निवडणूकीत इंन्ट्री ही प्रस्तापिताना घाम फोडू शकते यात कुठलीही शंका नाही .

गेवराई मतदार संघात काम करत असतांना मोठा मित्र परिवार महेश दाभाडे यांच्याकडे आहे आ लक्ष्मण पवार यांनाच नाही तर माजी जिप अध्यक्ष विजयसिंह पंडित व माजी मंत्री बदामराव पंडित यांना देखील महेश दाभाडे यांचा मताचा फटका बसु शकण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांच्या राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) यांच्यात प्रवेश केल्यानंतर पुन्हा गेवराई तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठी तागद मिळणार आहे व ताकतीचा नेता म्हणून महेश दाभाडे यांच्याकडे पहण्याचा दृष्टीकोन अनेकांचा आहे तसेच विधानसभा निवडणूकीची शिवसेना ( ठाकरे गट ) राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) आणि कॉंग्रेस यांची युती असल्याने विधानसभा तिकीटासाठी गेवराई मतदार संघात संघर्ष पाहायला मिळेल तसेच महेश दाभाडे यांची विधानसभा लढविण्याची ईच्छा अनेकांचे स्पप्नभंग करू शकते असे बोलले तरी वावगे ठरणार नाही.तसेच ते गेवराई मतदार संघात निर्णायक ठरू शकतात हे देखील अंतिम सत्य आहे ते कोणीही नाकारू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *