धोंडराईत गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा;दिड ते दोन क्विंटल गांजाची झाडे जप्त 

उप अधिक्षक निरज राजगूरू यांची कार्यवाई

 

गेवराई दि 21 ( वार्ताहार ) तालुक्यातील धोंडराई परिसरात कपाशीच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती पोलिस उप अधिक्षक यांना मिळाली होती तसेच याठिकाणी त्यांनी आपल्या पथकासोबत छापा मारला असता अंदाजे दिड ते दोन क्विटल गांजाची झाले सापडली असल्याची माहिती असुन सात ते आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, धोंडराई परिसरात गणपत साखरे यांनी आपल्या शेतात कपाशीच्या पिका अंतर्गत गांज्याची झाडे लावली होती तसेच पोलिस उप अधिक्षक यांना गूप्त बातमी दारामार्फत ही माहिती मिळाली व सदर ठिकाणी छापा मारला असता दिड ते दोन क्विटल गांजाची झाडे लागवड असल्याचे दिसुन आले सदर ठिकाणाहून वरील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच ही कार्यवाई पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर ,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर , यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक निरज राजगूरू ,पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिष कोठकर ,पोहे उबाळे , पोहे उगमुले ,पोह कावळे यांनी केली असुन अधिक तपास गेवराई पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *