गेवराई दि 17 ( वार्ताहार ) गेवराई वरूण बीडच्या दिशेने वाळूचा हायवा भरघाव वेगात चालला असता पाडळशिंगी टोल नाक्याजवळ या वाळूने भरलेल्या हायवाने क्रूझर गाडीला जोराची धडक दिली व या अपघातात पाच लोक गंभीरित्या जखमी झाल्याची माहिती आहे सदरचा हायवावर लाल अक्षरात सुहाना नाव असल्याची माहिती असुन पोलिस या प्रकरणी काय? कार्यवाई करतात तसेच गेवराई तालुक्यातली अवैध वाळू तस्करी कथी? थांबनार व हा वाळू उपसा कितीजनाचे बळी घेणार या हायवावर कार्यवाई करण्याची मागणी होत आहे .तसेच सदरची घटना ही आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे जखमींना बीड च्या दिशेने हलवण्यात आल्याची माहिती आहे.तसेच या प्रकरणी पोलिस निरीक्षक धंनजय फराटे यांना संपर्क केला असता या हायवाचा चालकासह मालकांवर गून्हा दाखल करूण कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.