पथकावरील हल्ला प्रकरणी गुन्ह्यात संशयाचा धूर?

आरोपीची नावे वगळली असल्याची चर्चा

 

गेवराई 13 ( वार्ताहार ) तालुक्यातील म्हाळजपिंपळ गाव परिसरात पोलिस अधीक्षक पथक प्रमुख साहय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांच्यासह एक कर्मचारी यांच्यावर जिवघेन्ना हल्ला केल्या प्रकरणी दोघां विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे परंतू हा गून्हा दाखल करताना चिरीमिरी घेऊन एका मोठ्या वाळू माफिया यांचे नाव वगळले असल्याची चर्चा आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की,( दि 11 रोजी ) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पोलिस अधिक्षक यांचे पथक प्रमूख गणेश मुंडे व एक सहकारी हे गस्त घालत असतांना म्हाळजपिंपळगाव परिसरात एक ब्लॅक स्कॉर्पियो त्यांचा पाठलाग करत होती त्यांनी त्यांना हात दाखऊन थांबवण्याच्या प्रयत्न केला परंतू या गाडीत चालकासह चार व्यक्ती असल्याची माहिती त्यांनी सदरील पथक प्रमुख यांच्या अंगावर गाडी घालुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला परंतू फिर्यादीत ज्या मोबाईल नंबर वरूण गणेश मुंडे यांना फोन केले होते त्याला या प्रकरणात आरोपी का? केले नाही तसेच त्यांचे सिडीआर व फोन लोकेशन तपासल्यानंतर हा व्यक्ती त्या ठिकाणी गाडीतच होता हे सिध्द होईल .तसेच या व्यक्तीच्या नावे यापुर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गून्हे दाखल आहेत तसेच ह्या गून्ह्यात यांचे नाव आले असते तर यांच्यावर एमपीडीऐ कायद्या अंतर्गत कार्यवाई झाली असती म्हणून या प्रकरणात मोठी देवानघेवान झाली असल्याची माहिती आहे म्हणून सदरच्या गून्ह्यातून यांचे नाव वगळले आहे तसेच पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी दोन पथके नियुक्त केलेली आहेत परंतू हे दोन्ही पथक प्रमुख गेवराई तालुक्यातच सक्रीय आहेत जिल्ह्यात फक्त गेवराई तालुक्यातच जास्त पथकाचे दौऱ्ये कसे? होतात याकडे देखील लक्ष घालण्याची गरज आहे तसेच या प्रकरणात स्वत;पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी लक्ष घालावे अशी मागणी होऊ लागली आहे या प्रकरणी साहय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांना संपर्क केला असता मी सविस्तर माझी तक्रार नोंदविली आहे असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *