पोलिस अधीक्षक पथकावर हल्ला;म्हाळजपिंपळगाव येथील घटना

गणेश मुंडेच्या अंगावर गाडी घातली 

गेवराई दि 11 ( वार्ताहार ) जिल्ह्यात वाळू माफियांना सळो की पळो करून सोडणारे पोलीस अधिक्षक पथक प्रमुख, सपोनि गणेश मुंडे व एका पोलीस कर्मचाऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी 6 च्या सुमारास घडली.एसपींच्या पथकावरच थेट असा हल्ला करण्यात आल्यामुळे वाळू माफियांचा मुजोरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

  याबाबद सविस्तर माहिती अशी की,आज पहाटे गणेश मुंडे व पोलीस कर्मचारी श्री.वायबसे म्हाळसपिपंळगावच्या वाळू साठ्याची पाहणी करून राक्षसभुवनकडे जात होते. यावेळी सकाळी 6 च्या सुमारास राक्षसभुवन फाट्यावर काळ्या रंगाची स्कर्पिओ विनानंबरची थांबलेली होती. सदर गाडी गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. राक्षसभुवन फाट्यावर मुंडे यांनी त्या स्कर्पिओला हात दाखवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीने दिलेल्या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे. सदर प्रकरणातील आरोपी हा जालना जिल्ह्यातील गोंदी येथील असल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे कळते.दरम्यान गणेश मुंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येतं असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. माफियांचा मुजोरपणा मोडीत काढणे आता पोलिसांसमोर एक आव्हान असणार तसेच रात्री उशीरा पाडळशिंगी जवळ एक हायवाचा अपघात झाला व तो हायवा कुनाचा?याची चौकशी देखील पोलिस अधिक्षक यांनी करावी तसेच वाळू माफिया थेट पथकावर हल्ला कसे? करतात यांचे आत्मपरिषण करणे देखील गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *