बीड ऑनलाईनच्या पाच चक्री अड्यावर धाड;आयपीएस पंकज कुमावत पथकाची कार्यवाई
3,72,930/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
बीड दि 8 ( वार्ताहार ) बीड शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो चक्रीचा पडदा फाश करण्यात आला आहे तसेच शहरातील पाच ठिकाणी सुरू असनाऱ्या या ठिकाणी आयपीएस पंकज कुमावत यांनी छापेमारी केली तसेच लाखों रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन यामध्ये थेड दिल्ली कनेशन असल्याची बाब समोर आली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की,(दि 7 रोजी) मा.पंकज कुमावत सहा पोलीस अधीक्षक उप विभाग केज यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार मा. पंकज कुमावत सहा. पोलीस अधीक्षक उप विभाग केज यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी याना आदेशात केले की,बीड शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत,तेथे जाऊन रेड करा अशे आदेशीत केल्याने त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बीड शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 5 वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंद्यावर रेड केल्या असून ऑनलाइन बिंगो चक्रीच्या कारवाया करून 5 गुन्हे दाखल केले आहेत.त्यामध्ये एकूण 3,72,930/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व एकूण 17 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यापैकी आरोपी नामे सिद्धार्थ नागड रा.लक्ष्मीनगर नवी दिल्ली येथील राहणारा असून तो ऑनलाइन बिंगो चक्री साठी आयडी पुरवीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे ऑनलाइन बिंगो चक्रीचे कनेक्शन दिल्ली पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच या कार्यवाईमुळे अवैध धंदे करनारे यांचे धाबे दणानले आहेत
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या आदेशाने उप निरीक्षक राजेश पाटील, पोलीस हवालदार बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गीते,पोलीस नाईक अनिल मंदे,पोलीस अंमलदार महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे, शमीम पाशा, गोविंद मुंडे, भरत शेळके यांनी केली आहे.