गेवराई दि 4 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरातील गोदापात्रात अवैधरित्या वाळूची वाहतूक करूण उत्खनन केली जात असल्याची माहिती बीड पोलिस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे व चकलांबा पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना मिळाली त्यांनी सदर ठिकाणी झापा मारला असता सहा ट्रॅक्टर केनीसह एक हायवा व दिड ते दोन हजार ब्रास वाळू या कार्यवाईत जप्त केली असल्याची माहिती आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , राक्षसभूवन शनिचे याठिकाणी शासकीय वाळू डेपो आहे तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याची कुनकून पोलिसांना लागली होती तसेच गूप्त बातमीदाराने ही माहिती पोलिस अधीक्षक पथक प्रमुख साहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे व चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना देण्यात आली होती सदरचे दोन्ही प्रभारी अधिकारी यांनी आपल्या पथकासोबत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा मारला तसेच सहा ट्रॅक्टर व केनीच्या साह्याने गोदापात्रात वाळू उपसा सुरू होता तसेच याठिकाणी हजार ते दिड हजार वाळू साठा पडलेला होता तसेच एक विना नंबरचा हायवा सदर ठिकाणी वाळूने भरूण चालला होता पोलिसांनी यांच्या चालकाला पावती व ईनव्हाईसची विचारणा केली असता चालकांकडे पावती व ईनव्हाईस नव्हता यामुळे हायवा जप्त करण्यात आला तसेच आत्तापर्यंत राक्षसभूवन परिसरातील गोदापात्रात ही सर्वात मोठी कार्यवाई असल्याचे बोलले जात असुन साहय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे व साहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या या कार्यवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले असुन या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे .