बीड आरटीओ मधील पोपटाचा वीर पराक्रम चक्क बनावट इन्शुरन्स जोडून ट्रकचा बोजा उतरविण्याचा प्रयत्न 

बीड दि 4 ( वार्ताहार ) आरटीओ कार्यालय नेहमी बोगस व खोट्या कामांसाठी सदैव चर्चेत असते. पोपट वीर या भामट्या दलालने ट्रक या वाहनाचा खोटा इन्शुरन्स बनवून वाहनावरील कर्ज उतरवण्यासाठी अर्ज केला असता त्याला कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून सदर बाब उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री स्वप्निल माने यांच्या निदर्शनास आणून दिले. कार्यालयात खोटे कागदपत्रे का सादर केली अशी विचारणा केली असता,त्यावर उलटपक्षी माझे काम नाही केले तर मी तुमची तक्रार करून उपोषणाला बसेल अशी धमकी पोपट वीर हा दलाल कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना देत होता.

श्री माने यांच्या आदेशानुसार इन्स्पेक्टर गणेश विघ्ने यांनी सदर इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधून इन्शुरन्स ची सत्यता पडताळणी व कंपनीची पत्रव्यवहार केला असता सदर कंपनी ही ट्रक या संवर्गातील वाहनांचा इन्शुरन्स देत नसल्याचे निदर्शनास आले.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री स्वप्निल माने यांनी सदर प्रकरणात स्वतः फिर्याद देऊन दलाल पोपट वीर व गाडी मालक गोवर्धन जाधव यांच्या विरोधात उपस्थित राहुन बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली व पोपट वीर याच्या विरोधात भादंवि 420,465,467,468,471 व 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच आरोपी दलाल पोपट वीर फरार झालेला आहे.आरोपी हे वकील असुन त्यांच्याकडुन अशा पद्धतीने बनावटीकरण अत्यंत अशोभनीय आहे स्वप्निल माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीड कार्यालयात 420 सी करणाऱ्या दलालांची संख्या जास्त असल्याने नागरिकांना स्वतःची कामे स्वतः करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा व फसवणूक करणाऱ्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या दलालांना कामे देऊ नयेत. असे गणेश विघ्ने मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय.यांनी सांगितले आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *