बीड दि 2 ( वार्ताहार ) सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांना मिळालेल्या बातमी मार्फत पोलीस स्टेशन बीड शहर हद्दीमध्ये बीड शहरामध्ये आरोपी नामे देविदास सोनाजी जगताप हा काही इसमाना घेऊन त्याचे गाळ्यामध्ये ऑनलाइन बिगो चक्री नावाचा जुगार खेळत असल्याने सदर ठिकाणी स्टाफसह जाऊन रेड करून ऑनलाइन बिंगो चक्री जुगाराचे साहित्य लॅपटॉप एलईडी स्क्रीन मोबाईल व नगदी रक्कम असा एकुण किंमती 2,63,300/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी नामे देविदास सोनाजी जगताप (मालक) (जागा मालक) व इतर तीन साथीदार आरोपी, जागा मालक व आयडी देणारा आरोपी नामे आनंद शेटे असे एकूण सहा आरोपी यांचे वर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की ,पोलीस स्टेशन पेठ बीड हद्दीमध्ये ऑनलाइन बिंगो लॉटरी, सुरट व मटका च्या तीन वेगवेगळ्या रेड करून एकूण पाच आरोपी विरुद्ध पेठ बीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर तीन रेड मध्ये किमती 56,660/- रुपेचा मुद्देमाल दाखल करण्यात आला आहे
सदर चारही कारवाया मध्ये एकूण किंमती रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश पाटील, बालासाहेब डापकर, दिलीप गीते, अनिल मंदे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे, भरत शेळके यांनी केली आहे