April 19, 2025

करचुंडीत 16 लाखं 54 हजाराचा गांजा पकडला

आयपीएस पंकज कुमावत यांची धडाकेबाज कार्यवाई

 

बीड दि 26 ( वार्ताहार ) नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असनाऱ्या करचुंडी गावात एका शेतात गांजाची झाडे लावण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी छापा मारून 16 लाख 54 हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व चार आरोपी विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की ,दि 25 रोजी सहा. पोलीस अधिक्षक केज, श्री. पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे नेकनुर हाद्दीत मौजे करचुंडी ता. जि. बीड येथे ईसम नामे 01. बाळासाहेब देवराव शिंदे, वय 35 वर्ष 02. बंकट कल्याण शिंदे, वय 35 वर्ष, 03. डिगांबर आश्रुबा शिंदे, वय 45 वर्ष, 04. कुंडलीक निवृत्ती औटे, सर्व रा. करचुंडी ता. केज जि.बीड यांनी त्यांचे स्वत:चे मालकीचे शेतामध्ये बेकायदेशिर रित्या गांज्याची लागवड करुन त्याचे सवर्धन केले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन त्या अन्वये मा. श्री. पंकज कुमावत, सहा. पोलीस अधिक्षक साहेब, केज यांनी सदर बातमीची माहिती श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक साहेब, बीड यांना देवुन मा. पोलीस अधिक्षक साहेब, बीड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत साहेब सोबत, श्री. प्रशांत सुपेकर, नायब तहसिलदार, बीड, श्री. विलास हजारे, सहा. पोलीस निरीक्षक, दोन शासकीस पंच, पोउपनि पानपाटील, पोउपनि रोकडे, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोह / 1203 डोंगरे, पोह/ 232 क्षीरसागर, पोह / 1547 बळवंत, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोना / 1516 पुंडे, पोअं/ 280 शेळके, पाअं/ 893 मुंडे, पोलीस अंमलदार शमीम पाशा, पोअं/ 444 ढाकणे, पोअं/ 1885 क्षीरसागर, पोना / 837 राख, पोह/ 1244 राऊत,, होमगार्ड धन्वे, शेख, वरभाव, कुलकर्णी, वाघमारे, शेख, घरत, यांचे टिमने करचुंडी ता. जि. बीड येथे मिळालेल्या बातमीची खात्री करुन सदर शेतामध्ये छापा मारला असता एकुण 330 कि.ग्रॅ. गांजा ज्याची किंमत 16,54,600/- ( सोळा लाख चोपन हजार सहाशे ) असा लागवड केलेला मिळुन आल्याने आरोपीस यातील आरोपी नामे 01. बाळासाहेब देवराव शिंदे, वय-35 वर्ष 02.बंकट कल्याण शिंदे, वय-35 वर्ष, 03 डिगांबर आश्रुबा शिंदे, वय 45 वर्ष, 04. कुंडलीक निवृत्ती औटे, सर्व रा. करचुंडी ता. केज जि. बीड यातील आरोपी क्रमांक 01 ते 03 यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे नेकनुर ता. जि. बीड येथे आलोत व पोउपनि पानपाटील यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे नेकनुर गु.र.नं. 291 / 2023 कलम 20 NDPS कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री.नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, बीड व श्रीमत कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत साहेब सोबत, श्री. विलास हजारे, सहा. पोलीस निरीक्षक, दोन शासकीस पंच, पोउपनि पानपाटील, पोउपनि रोकडे, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोह/ 1203 डोंगरे, पोह/ 232 क्षीरसागर, पोह / 1547 बळवंत, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोना / 1516 पुंडे, पोअं/ 280 शेळके, पोअं/ 893 मुंडे, पोलीस अंमलदार शमीम पाशा, पोअं/444 ढाकणे, पोअं/ 1885 क्षीरसारगर, पोना / 837 राख, पोह/ 1244 राऊत, होमगार्ड धन्वे, शेख, वरभाव, कुलकर्णी, वाघमारे, शेख, घरत, खंदारे यांचे टिमने यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *