महेश दाभाडे यांची विधानसभेची घोषणा;आ लक्ष्मण पवार यांना धोक्याची घंटा
प्रबळ पक्षाची उमेदवारी मिळाली तर महेश दाभाडे करिष्मा करतील.
गेवराई दि 26( वार्ताहार ) गेवराई विधानसभा मतदार संघात पंडित पवार यांचे निर्वीवादीत वर्चस्व राहिले आहे यांना अत्तापर्यंत चौथा तगडा उमेदवार नव्हता परंतू गेवराईचे माजी नगरअध्यक्ष महेश दाभाडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असण्याचे संकेत दर्शविले आहेत तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांची भेट घेतली व ब्कॅकफुटवर गेलेले महेश दाभाडे पुन्हा चर्चेत आले आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , मराठा महासंघातून सामाजिक चळवळीतून महेश दाभाडे हे नेतृव उदयास आले गेवराई नगर परिषदेत निवडणूकीत नगरसेवक पदाची हॅट्रिक करूण ते उपनगरअध्यक्ष ते नगर अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे तसेच चकलांबा जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली परंतू त्यांचा पराभव झाला असा महेश दाभाडे यांचा राजकीय खडतर प्रवास आहे .
परंतू गेवराई विधानसभेचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या गटातील कोरकमिटीतील महेश दाभाडे यांची याठिकाणी मदभेद झाले तिन वर्षापासुन ते पक्षाच्या व कार्यलयात व आमदार यांच्याशी कसलाही संपर्क त्यांनी ठेवला नाही तसेच त्यांची मध्यस्थी करण्यात भाजप कार्यकर्ते असमर्थ झाले महेश दाभाडे यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले परंतू त्यांनी राष्ट्रवादीचे खा शरद पवार यांची भेट भेट घेतल्यानंतर गेवराई विधानसभा मतदार संघात चर्चा सुरू झाल्या परंतू महेश दाभाडे यांनी राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार आहे त्यांचे कारण असे आहे की शिवसेना ( ठाकरे गट ) कॉग्रेस , आणि राष्ट्रवादी ( शरद पवार गट,) यांची युती आहे या ठिकाणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचा उमेदवारीवर दावा असणार आहे ही एक मोठी अडचण महेश दाभाडे यांना पक्षप्रवेशानंतर होऊ शकते तसेच त्यांनी जर अपक्ष निवडणूक लढविली तर त्यांचे राजकीय अस्तिव धोक्यात येऊ शकते कारण तिन प्रस्तापित यांच्या विरोधात त्यांचा लढा आहे तसेच याठिकाणी त्यांना वंचित आघाडी हा देखील एक पर्याय असु शकतो
आ लक्ष्मण पवार (भाजपा) , माजी मंत्री बदामराव पंडित ( शिवसेना ठाकरे गट) विजयसिंह पंडित( राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अपक्ष ),मयुरी बाळासाहेब मस्के ( बी आर एस ) महेश दाभाडे ( राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा अपक्ष ) याशिवाय वंचित देखील तगडा उमेदवार देऊ शकते अशी लढत जर झाली सरळ सरळ माजी मंत्री बदामराव पंडित व विजयसिंह पंडित यांच्यात लढत होईल. तसेच महेश दाभाडे प्रबळ पक्षाची उमेदवारी घेऊन जर लढले तर माजी मंत्री बदाराव पंडित ,विजयसिंह पंडित , आणि महेश दाभाडे यांच्यात तिरंगी लढत होईल विद्यमान आमदार यांना पक्षाचा व अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागेल यामध्ये त्यांचा पराभव देखील होऊ शकतो.तसेच विधानसभा निवडणूकीत महेश दाभाडे यांची ऐंन्ट्री झाली तर आ लक्ष्मण पवार हे ब्कॅकफूटवर जातिल.तसेच महेश दाभाडे यांच्या या बंडामागे बीड जिल्ह्याच्या भाजपाची अदृष्य शक्ती आहे असे देखील बोलले जात आहे असे जर असेल तर घरका भेदी लंका डाऐ असे होईल. आ लक्ष्मण पवार यांच्या पराभवाचे कारण महेश दाभाडे ठरू शकतात परंतू त्यांच्या विधानसभा निवडणूक लढविल्याने गेवराई मतदार संघात करिष्मा होईल.हे त्रिवार सत्य आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...