पती पत्नीची आत्ममहत्या;गेवराई तालुक्यातील जातेगाव याठिकाणची घटना
गेवराई -दि 12 ( वार्ताहार ) तालुक्यातील जातेगाव येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आज (दि.१२) उघडकीस आली आहे. दाम्पत्याच्या लहान मुलीने घर बंद केल्याचे पाहून आरडा ओरड केल्यानंतर आजू- बाजुच्या नातेवाईकांनी पत्रा उचकटून पाहिले असता दोघांचे मृतदेह घरात आढळून आले.
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील राजु बंडू चव्हाण (वय- 31) आणि सोनाली राज चव्हाण (वय- 28) असे मयत दाम्पत्यांचे नाव आहे. आज सकाळी जातेगाव येथे मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलन झाले. या आंदोलनात राजु चव्हाण हे सहभागी झाले होते अशी माहिती समोर आली आहे त्यानंतर हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती कळताच तलवडा ठण्याचे स.पो.नि शंकर वाघमोडे जातेगाव बीटचे अंमलदार नारायण डे. पो. ह. महेश झिखरे यांनी घटनास्थळी काकडे, भेट देवून पाहणी केली. दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.