गेवराई दि 12 ( वार्ताहार ) गेवराई शहरात तसेच पोलिस ठाणे गेवराईचे हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत राजरोज शहरात मटका , पत्याचे क्लब, गूटखा , विना परवाना अवैध वाहतूक , वाळू चोरी , यासह अनेक धंद्ये याठिकाणी राजरोज पणे सुरू आहेत रात्रीच्या माहार्गावर जाणाऱ्या प्रवासी यांना लुटमार करणे अश्या गंभीर घटनेत वाढ झाली असुन पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी वसुली करण्यासाठी चार कर्मचारी नेमले असल्याची माहिती असुन ते ठाण्याचा पदभार संभाळण्यात अकार्यक्षम असल्याचे जानवते .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई पोलिस ठाण्यावर अनेक गावाचा भार आहे बीड जिल्हात भोगोलिक दृष्टीकोनातून हा तालुका मोठा आहे तसेच याठिकाणी अनेक माफिया हे पोलिसांच्या जिवावर गावागावात दादागिरी करतात तसेच वाळूच्या हायवा गाड्याची हप्ते वसुली करण्यासाठी दोन कर्मचारी यावर नियुक्त आहेत तसेच अनाधिकृत वाळू उपस्यासाठी ट्रॅक्टर आणि केन्या वापरल्या जातात यासाठी स्पेशल एक कर्मचारी नियुक्त आहे तसेच दाखल झालेल्या गून्ह्यात अर्थिक तडजोड करण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त आहे तसेच गेवराई शहरातून खाजगी वाहतूक एपेरिक्षा व ट्रॅव्हल्सची वसुली करण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त आहे या ठिकाणी कर्तव्यावर असनारे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांचे सर्वाधिक लक्ष हे अर्थिक देवानघेवाणीकडे आहे तसेच दररोज दरोडे , रोडरॉबरी यासारखे गंभीर स्वरूपाच्या घटनामध्ये वाढ होत चालली असुन या प्रकरणी पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांनी लक्ष घालून कायदा व सुवेस्था आबाधित ठेवण्यासाठी गेवराई पोलिस ठाण्याचा पदभार खमक्या अधिकारी याकडे द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे या प्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .