गेवराई दि 8 ( वार्ताहार ) गेवराई शहरातील खडकपूरा परिसरात एका कापड दूकानात काम करनाऱ्या एका कामगाराने आपल्या मालकांच्या तिन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना आज ( 8 सप्टेंबर ) रोजी उघडकीस आली असल्याने गेवराई शहरात खळबळ उडाली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , कापड दूकानात पंदरा वर्षीय अल्पवयीन तरूण कामाला होता दूकानात एकटा असल्याने त्या ठिकाणी मालकाची तिन वर्षाची लहान मुलगी तिचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच ही घटना लक्षात येताच पिडीतेच्या नातेवाईक यांनी गेवराई पोलिसांत धाव घेतली व पिडीतेच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असुन अल्पव – यीन आरोपी विरूद्ध गेवराई पोलिसांत गून्हा दाखल झाला असुन त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत सदरच्या घटनेचा पुढील तपास पिंक पथक प्रमुख साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे हे करत आहेत