गेवराई दि 22 ( वार्ताहार ) रेवकी देवकी ता. गेवराई जि.बीड येथील बाळासाहेब भगवानराव मस्के व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून जाणीवपूर्वक व राजकीय आकसापोटी आमच्या धनगर समाजातील अनेक लोकांना पैसा व दादागिरीच्या माध्यमातून विनाकारण त्रास देत आहे. आमच्या समाजातील लोकांना तो खोट्या गून्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो धमक्या देत असतो. त्यामुळे त्याला घाबरून कोणीही त्याला विरोध करत नाही. त्याचाच चुलत भाऊ याने देवकी येथील प्रकाश देवकते, सखाराम वाघमोडे, लहु व्हरकटे, श्रीराम वाघमोडे, शिवाजी देवकते, आप्पा व्हरकटे व इतरांच्या विरुद्ध अॅट्रोसिटीच्या खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत.तरी सदरच्या व्यक्तीवर सोशल मिडिया एक्ट नूसार गून्हा दाखल करावा अशी मागणी गेवराई तहसिलदार यांना निवेदनाव्दारे केली आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की, हा व्यक्ती तसेच आमचे धनगर समाजाच्या लोकांना बाळासाहेब मस्के हा सतत खालच्या पातळीवर जावुन शिवीगाळ करतो. तो पूर्वी भाजपा या राजकीय पक्षात काम करत होता. त्यानंतर त्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता व आता त्याने तेलंगनाचे मुख्यमंत्री के.सी. आर. राव यांच्या बी. आर. एस. या पक्षामध्ये प्रवेश केलेला असून या पक्ष प्रवेशाच्या वेळी आमच्या धनगर समाजातील लोकांवर त्याच्या सोबत या राजकिय पक्षाचे काम करण्यासाठी दबाव टाकला होता. परंतू धनगर समाजातील लोकांनी बाळासाहेब मस्के या व्यक्ती बरोबरबी. आर. एस. पक्षामध्ये प्रवेश करण्यास नकार देऊन त्याला मदत केली नाही याचा राग मनात धरुन आमच्या समाजातील प्रतिष्ठीत लोकांना तो जाणीवपूर्वक बदनाम करत आहे.
तसेच बाळासाहेब मस्के या व्यक्तीने मागिल काही दिवसापूर्वी रेवकी या गावातील तरुण गोकुळ चौरमले याच्या विरुध्द वाद करून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मौजे लुखामसला ता. गेवराई जि.बीड येथील गजानन काळे यांच्या गाडीवर गुंडांना सांगुन हल्ला केला होता. बाळासाहेब मस्के व विलास रामभाऊ देवकते यांच्यामध्ये काहीही संबंध नसतांना देखील केवळ विलास देवकते यांची गावात व समाजाल बदनामी करण्याच्या हेतूने बाळासाहेब मस्के हा व्यक्ती व्हॉटसएप फेसबुक, इत्यादी वरून सतत त्यांच्या विरुद्ध चुकीच्या व बदनामीकारक पोस्ट करत असतो. बाळासाहेब मस्के याने रेवकी येथील विलास देवकते या आमच्या समाज बांधवावर दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी राजेंद्र रामराव नराडे रा. हिंगनगाव ता. गेवराई जि.बीड- ह.मु. चितेगाव ता. पैठण जि. औरंगाबाद याच्या हातून गेवराई पोलीस स्टेशन मध्ये फौजदारी संहिताच्या कलम १५४ अन्वये रजि.नं. १२०-ब, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, भा. दं. वि. नुसार गुन्हा दाखल केला असून तो रद्द करावा व बाळासाहेब भगवानराव मस्के या व्यक्ती विरुद्ध सोशल मीडिया एक्ट अन्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी अशी आम्ही सर्व समाजबांधव करीत आहोत हे निवेदन धनगर समाजाच्या वतिने जालिंदर पिसाळ , गजानन काळे ,फूलचंंद बोरकर , प्रा गजानन काकडे यांनी गेवराई तहसिलदार यांना दिले आहे तसेच या प्रकरणी बाळासाहेब मस्के यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...