April 19, 2025

गाढेवाढीची भाजपा राष्ट्रवादीत विलीन

अमरसिंह पंडित यांनी केले स्वागत

गेवराई दि. 21 ( वार्ताहार ) गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे गाढेवाडी येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश वावरे यांच्यासह भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिट्ठी देत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गाढेवाडी येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश वावरे, मच्छिंद्र मोरे, भरत महारगुडे, सोपं महारगुडे, विशाल गाढे, सातीराम महारगुडे, विक्रम महारगुडे, किशोर महारगुडे, सचिन गाडे, सचिन लवटे, नितीन गाढे, सीताराम गाढे, लक्षीमन रुपनर, मारोती गाढे, भाऊसाहेब महारगुडे, गहिनीनाथ वावरे, भरत गाढे, पप्पू महारगुडे, कुंडलिक वावरे, सुभाष वावरे,रोहिदास गाढे, कृष्णा गाढे,विलास महारगुडे, बाळू महारगुडे, बंडू महारगुडे, तुळशीराम वावरे, भागवत रुपनर, गणेश गाढे, राहुल देवकते, संभाजी गाढे, छत्रपती गाढे, कृष्णा चव्हाण, लक्ष्मण गाढे, भीष्मा रुपनर, संभाजी महारगुडे, श्रीराम वावरे, गोरख वावरे, विष्णू लवटे, धनंजय मोरे सह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत केले.

याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती विकास सानप, सरपंच राजेंद्र कदम, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गजानन काळे, नारायण जरांगे, कारखान्याचे संचालक संदिपान दातखीळ, सरपंच विष्णू पिसाळ, सुरेश लोंढे, मदनराव घाडगे, रमेश करांडे, आबासाहेब करांडे, शरद बाराहते, पत्रकार संतराम जोगदंड, रमेश जगदाळे, सुरेश जाधव, अशोक करांडे, गोविंद गायकवाड, बाळू पाटील आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *