गेवराई येथे आश्रम शाळेत निवासी विद्यार्थांना गणवेशाचे वाटप

320 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य तसेच टॅबलेटचे वाटप

 

गेवराई :दि 12 ( वार्ताहार )  सुशील शिक्षण संस्था बीड संचलित, प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक व वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय नाईक नगर, गेवराई येथे ३२० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य तसेच प्रचलित युगात अत्यावश्यक असणारे टॅबलेटचे ३२० विद्यार्थ्यांना वाटप करुन शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गेवराई तहसिल कार्यालयाचे तहसीलदार संदिप खोमणे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष दिनेशराव पवार, संस्थेचे अध्यक्ष सुशीलभाऊ पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, गेवराई पोलीस स्टेशनचे बोडके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चव्हाण डी एम, गटशिक्षण कार्यालयाचे तारुरकर सर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी सुशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुशील भाऊ पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की माझ्या शाळेचा विद्यार्थी स्टेज समोर स्टेजवर अध्यक्षस्थानी दिसला पाहिजे . आश्रम शाळेमध्ये ज्या शैक्षणिक सुविधा आहेत याचा विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील प्रत्येक मुलांनी लाभ घेतला पाहिजे .यातच मला समाधान मिळेल. जर विद्यार्थी डॉक्टर, इंजीनियर ,आय आय टी क्षेत्रात जात असेल तर याचे सर्व श्रेय माझ्या कर्मचाऱ्यांच्या जाते. वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य राठोड आर आर यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणामध्ये शाळेमध्ये असणारी विद्यार्थी पटसंख्या शाळेची भौतिक व शैक्षणिक सोयी सुविधा बाबत माहिती दिली. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी मॅडम यांनी आपल्या भाषणामध्ये शालेय जीवनामध्ये खेळाचे महत्त्व पटवून दिले. तहसीलदार संदीप खोमणे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण खूप नशीबवान आहात आपल्याला सर्व सोई नियुक्त सुविधा मिळत आहे.हे खेळण्याचे वय असून त्याचबरोबर शिक्षण घेण्याची ही वय आहे शाळेची इमारत व परिसर पाहून मला खूप आनंद वाटला असेही शेवटी बोलताना सांगितले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेशरावजी पवार साहेबांचे कौतुक केले.सूत्रसंचालन महादेव काळे यांनी तर आभार प्रदर्शन श्याम वादे सर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *