निशब्द; गोदाकाठचा कोहिनूर हिरा हरपला
बापुराव चव्हाण यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
गेवराई : दि 5 ( वार्ताहार ) तालुक्यातील गुळज येथील शिवसेनेचे युवा नेते तथा गुलमेश्वर गुळ कारखान्याचे चेअरमन पंचायत समिती सदस्य बापुराव बबनराव चव्हाण (वय वर्ष 42) यांचे शनिवार दि. 5 रोजी सकाळी 9 वाजता र्हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले असून गोठाकाठचा कोहिनूर हिरा हरपला आहे. तसेच या घटनेने सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी गुळज येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, ह.भ.प.रंगनाथ महाराज, ह.भ.प.संभाजी महाराज,माजी सभापती युध्दाजित पंडित, युवा नेते रणवीर पंडित, बबनराव गवते, दिलीपराव गोरे, भाऊसाहेब नाटकर, बाळासाहेब मस्के, परमेश्वर वाघमोडे, शाहिनाथ परभणे, नवनाथ जाधव यांच्या सह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच नातेवाईक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.