अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त केशवराव संस्थान येथे विष्णू यागाचे आयोजन

 

गेवराई दि 4 ( वार्ताहार ) अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त गेवराई येथील श्री संस्थान केशवराज मंदिर या ठिकाणी दिनांक 6 व 7 ऑगस्ट रोजी महाविष्णू यागाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी या यज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संस्थान केशवराज मंदिर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गेवराई येथील श्री संस्थान केशवराज मंदिर येथे श्रीविष्णू भगवान यांचे प्राचीन व नवसाला पावणारी मूर्ती असून अधिक मासानिमित्त विष्णू देवतेला विशिष्ट महत्त्व असते. या पुरुषोत्तम मासानिमित्त संस्थांच्या वतीने दिनांक 6व7 ऑगस्ट रोजी जनकल्याणासाठी महा यागाचे आयोजन करण्यात आले आहे .दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता या यज्ञाला सुरुवात होऊन. आठ ते पाच वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी या ठिकाणी करण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी दिनांक 7 ऑगस्ट रोजी यज्ञ आणि धार्मिक विधी होणार असून दुपारी दोन वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी भक्तांनी या महायगाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संस्थान केशवराज मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *