नरेगा कर्मचारी याला धक्काबूक्की ; पंचायत समितीचे कामकाज बंद
गेवराई दि ३ ( वार्ताहार ) पंचायत समिती अंतर्गत येनाऱ्या रोजगार हमी योजनेचे कामकाज पाहनाऱ्या एका कर्मचारी याला एक पत्रकार आणि अन्य एकाने धक्काबूक्की केल्याने पंचायत समिती गेवराईचे कामकाज बंद करण्यात आले असल्याची नोटीस गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर लावण्यात आली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , पंचायत समिती विभागातील कर्मचारी येवले आपल्या कार्यलयात काम करत असताना त्याठिकाणी रधूनाथ थोरात व उज्वल सुतार नामक दोन व्यक्तीनी धूडगूस घालत कर्मचारी येवले पैश्याची मागणी करत आहेत असा आरोप करत कर्मचारी येवले यांना त्या दोघांनी धक्काबूक्की केली असल्याची माहिती असुन सदरच्या कर्मचारी धक्काबूक्की केल्यानं पंचायत समिती विभागाचा कारभार गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे यांनी कामकाज बंद करण्यात आल्याची नोटीस आपल्या दालनासमोर लावली असल्याने कामबंद असल्याने अनेक नागरिक यांची गैरसोय झाली आहे तसेच या प्रकरणी गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...