January 23, 2025

गेवराई शहरात क्रांती मशाल मार्च काढून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना क्रांतिकारी अभिवादन

 

गेवराई दि. 1 ( वार्ताहार ) – लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी संविधान अधिकार मोर्चा समन्वय समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून क्रांती मशाल मार्च काढण्यात आला होता. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामाजिक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते भूमी अधिकार मोर्चा महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कडुदास कांबळे यांच्या हस्ते क्रांती मशाल मार्च सुरू करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा जयघोष करीत भव्य क्रांती मशाल मार्च लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती स्थळापर्यंत काढण्यात आला होता.

क्रांती मशाल मार्चमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराजे पंडित, ॲड. सुभाष निकम, ॲड. भगवान कांडेकर, भीमशक्ती गेवराई तालुकाध्यक्ष प्रकाशराव भोले, ॲड. बाळासाहेब घोक्षे, शिवाजीराव डोंगरे, अंबादास बाबा पिसाळ, रविंद्र पाटोळे, अजय गायकवाड अर्जुन सुतार बाबासाहेब गायकवाड तुकाराम खरात या प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
साठे नगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्यातील कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने या पद्धतीचे अभिवादन करण्यासाठी पहिल्यांदाच क्रांती मशाल मार्च आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास गेवराई शहरातील विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यावर्षीपासून पुढे दरवर्षी क्रांती मशाल मार्च काढून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येईल असेही यावेळी संविधान अधिकार मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *