गेवराई दि ३० ( वार्ताहार ) शहरालगतच्या बायपास वरील रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान शहरातील एक युवक चहा पिण्यासाठी गेला होता त्याला वाळूच्या हायवाने जोराची धडक दिली व त्यांच्या जागिच मृत्यू झाला असल्याची घटना ( शनिवारी रात्री १२ ) वाजण्याच्या दरम्यान घडली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , परेश दशरथ नेमानी ( वय ३५ वर्ष ) राहनार धनगर गल्ली गेवराई असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव असून हा युवक दररोज रात्री गेवराई बायपासवर चहा पिण्यासाठी जातो परंतू काल रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे मध्यरात्री बीड कडून गेवराई कडे जात असताना वाळूच्या रिकाम्या हायवाने त्याला उडविले व त्यांचा जागिच मृत्यू झाला आहे तसेच हायवा व अपघात करणारा चालक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती असून संबधीत तरूणाच्या नातेवाईकांनी जोपर्यंत गून्हा दाखल होत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेनार नाही असा पवित्रा घेतला आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...