खरीप हंगामाची ई – पीक पाहणी शंभर टक्के पूर्ण करावी – तहसीलदार खोमने
गेवराई दि २८ ( वार्ताहार ) : तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून, आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करुन शासनाच्या विविधि योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला १०० टक्के पुर्ण करावयाची आहे. असे तहसीलदार संदिप खोमने यांनी सांगितले आहे
खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकरी बंधु-भगिनीं, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल,
स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, वचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष- शेतकरी दुध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रीक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलज विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदचे सदस्य, मिडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेवून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. तसेच शेतकरी बंधु-भगिनींना यांनी केले आहे..
अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ईपीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्म, शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. आपले संबंधित तालुकानिहाय हेल्पडेस्कच्या माध्यमातून सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ई-पिक पाहणी करतांना शंका व अडचणी आल्यास ९७६३४९८९५५ या क्रमांकावर संपर्क करुन आपल्या अडचणीचे निरसन करावे. तसेच खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करण्यासाठी विविध घटकांनी सहभाग घ्यावे असे अवाहन तहसीलदार संदिप खोमने यांनी केले आहे .
धनंजय मुंडेंच्या कृषीमंत्री पदाचा लाभ सामान्य शेतकऱ्यांना मिळेल - अमरसिंह पंडित संशोधकांच्या उपस्थितीत गेवराईत मोसंबी विकास परिसंवादाचे आयोजन गेवराई, दि.१९...