January 22, 2025

सर्व शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करुन घेणे – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ

 

बीड दि २६ ( वार्ताहार ) जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रवी हंगामामध्ये बीड जिल्हयातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करुन शासनाच्या विविधि योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला १०० टक्के पुर्ण करावयाची आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई- पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. बीड जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनीं, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष- शेतकरी दुध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रीक सहाय्यक, बैंक प्रतिनिधी, शाळा व कॉलज विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदचे सदस्य, मिडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेवून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

तरी बीड जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्म, शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. आपले संबंधित तालुकानिहाय हेल्पडेस्कच्या माध्यमातून सकाळी ०८.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यत ई-पिक पाहणी करतांना शंका व अडचणी आल्यास खालील क्रमांकावर संपर्क करुन आपल्या अडचणीचे निरसन करावे.तालुका बीड’परळी हेल्प डेस्क क्रमांक८८०५२४७७७३,९६२३००४५८९तालुका गेवराई व शिरुर पाटोदा व आष्टी हेल्प डेस्क क्रमांक,९७६३४९८९५५,८७६६७७५४५२,माजलगाव, धारुर व वडवणी ९८९०४५६०६२ केज, अंबाजोगाई ९०९६५९१९९१,बीड जिल्हयात सध्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करण्यासाठी विविध घटकांनी सहभाग घ्यावा तसेच व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी ई-पीक पाहणी कामी योगदान दयावे असे अवाहन बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्रीम. दिपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *