April 19, 2025

प्रा रामलिंग गुळवे यांना मातृशोक

 

गेवराई – दि . २५ ( वार्ताहार ) -जेष्ठ योगशिक्षक तथा पतंजली योग समितीचे सदस्य प्रा .रामलिंग जगन्नाथअप्पा गुळवे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचे आज पहाटे निधन झाले . मृत्यूसमयी त्यांचा वय ७५ वर्ष होते . प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . परंतु मंगळवार दि . २५ जुलै रोजी पहाटे २. ३५ वाजता बीड येथे त्यांची प्राणज्योत मालवली . मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता पाचेगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले . उद्या सावडणे कार्यक्रम व परवा दिवसाचा कार्यक्रम आहे . त्यांच्या पश्चात ३ मुले – २ मुली सुना नातवंडे असा परिवार आहे . कै . लक्ष्मीबाई गुळवे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या दू;खात आंदोलन परिवार सहभागी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *