May 9, 2025

अनावश्यक खर्चाला फाटा देत दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत केला वाढदिवस साजरा

सोनी परिवाराचा आदर्श अन् सामाजिक उपक्रम

 

गेवराई, दि.२५ ( वार्ताहार ) सध्या वाढदिवस सर्वत्र धुमधडाक्यात साजरे केले जातात परंतू सामाजिक कार्यकर्ते लखन सोनी यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत चि.आरव रोहित सोनी याचा ११ वा वाढदिवस शहरातील मुकबधीर व मतिमंद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत मिष्टान्न भोजन देवून सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. यावेळी नातेवाईक, मित्र परिवार तसेच दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

गेवराई शहरातील रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कै.भगवानराव ढोबळे मुकबधीर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय येथे अनावश्यक खर्चाला फाटा देत चि.आरव रोहित सोनी याचा ११ वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग शाळेतील ५० विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी रामेश्वर बाहेती, लखन सोनी, आरती सोनी, गायत्री सोनी, रोहित सोनी, मोनिका सोनी, विहा सोनी, मिश्का सोनी, शिव प्रसाद लड्डा , गौरी लड्डा,नेतल, पूर्वी, पळसे मामा यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *