April 19, 2025

डॉ.आंबेडकर चौकापासून शांती मार्च काढून मणिपूर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन

 

गेवराई दि. २४ ( वार्ताहार ) मणिपूर येथील आदिवासी स्त्रिया वरील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संविधान चौक) येथून गेवराई शहरातील महिला पुरुषांनी शांती मार्च काढून गेवराई तहसीलदार यांना निवेदन दिले. मणिपूर राज्यातील कुकी आदिवासीवर झालेले निर्घुण हल्ले, खून, बलात्कार या घटना म्हणजे संविधानावरील हल्ला आहे असे गेवराई तहसील कार्यालयासमोरील सभेत बोलताना मुक्ता आर्दड यांनी व्यक्त केले.
     गेवराई शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधी महिला आणि पुरुष बहुसंख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये गेवराई शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ज्योती निकम, योगिता तांबारे,  मुक्ता आर्दड, ज्ञानेश्वरी आर्दड, शाहीन पठाण,  मंगलताई पवार, शरयू मोटे,  संध्या माटे या महिलांनी मणिपूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना कठोर शासन करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.
       यावेळी सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे,  एस वाय अन्सारी, ॲड. सुभाष निकम, प्रकाश भोले, यांनीही मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करूनविचार व्यक्त केले. मणिपुर येथील कुकी आदिवासी वर झालेले खुनी हल्ले,  तेथील महिलांचे झालेले लैंगिक शोषण आणि या शोषणानंतर त्यांना जिवंत जाळणे या घटना माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या आहेत. या घटना उजेडात येऊ नयेत म्हणून तेथील इंटरनेट यंत्रणा दोन महिने बंद केली होती. तब्बल दोन महिन्यानंतर या घटना समोर येत आहेत आणि आजपर्यंत ही येथील शासन सर्व संबंधित  गुन्हेगारांना ताब्यात घेण्यास समर्थ आहे, ही खेदजनक बाब आहे असे मत यावेळी बोलताना सुभाष निकम यांनी व्यक्त केले.
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका येथून निघालेल्या या शांती मार्चचे गेवराई शहरातील नागरिक अभिनंदन करताना दिसत होते. आम्हीही गेवराईतील सर्व लोक या न्यायाच्या बाजूने उभे आहोत अशी अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.
          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वरी आर्दड, जगदाळे संजीवनी, रोहिणी देशमुख, सुषमा वाव्हळ, कल्पना पवार, संगीता सागडे, अशा कदम, शकुंतला घुंगासे, यांनी विशेष परिश्रम घेतले होते. या कार्यक्रमांमध्ये ॲड. बाळासाहेब घोक्षे, विकास गायकवाड सुंदर बप्पा काळे, देविदास सोनाग्रा, रामकृष्ण चेडे, बाळासाहेब प्रधान, सय्यद अलीम सत्तार, विलास सोनवणे, अनिल बोराडे, शेख बशीर, दिलीप स्वामी, शिवाजी डोंगरे, डॉक्टर निकाळजे प्रभाकर, प्रदीप भास्करराव, सुवर्णा मोटे, निर्मला अरुण, साळुंखे शरला, मोनाली सावंत, पुनम भोसले अर्जुन सुतार, शेख खजीर, जयदेव शिंगणे या प्रमुख कार्यकर्त्यांनी विषय सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *