चकलांबा येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सुरु करा, चकलांबा येथील गावाकऱ्यांची मागणी

बस येत नसल्याने विदयार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

 

चकलांबा दि २३ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील शाळेत खळेगाव, पौळाचीवाडी,महांडुळा,व म्हांडुळा तांडा तसेच हिवरवाडी या गावातील विद्यार्थ्यांना चकलांबा येथे जाण्यासाठी एसटी शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. विद्यार्थी चकलांबा येथे माध्यामिक विद्यालय व जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे शिक्षणासाठी जाणे येणे करतात. विदयार्थ्यांना चकलंबा येथे येण्याजान्या साठी सकाळाची एक बस गाडी आहे. या एकाच गाडी ने शंभर ते सव्वाशे विद्यार्थी या मार्गाने शाळेत येत आहे.येताना सकाळी येणाऱ्या बस मध्ये बसायला जागा नसते ही एस टी भरगच्च भरुन आल्याने विद्यार्थीना आणि प्रवासी यांना उभे राहुन प्रवास करावा लागत आहे.

       कधी कधी तर एस टी वेळेवर येत नाही तर येतच नाही. काही विद्यार्थ्यांना एसटी मध्ये जागा नसल्याने काही विद्यार्थ्यांना पाई यावे लागत आहे .पाई आल्यानंतर विद्यार्थी परिपाटाला उपस्थित राहु शकत नाही.यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत असून माध्यमिक शाळा चकलांबा यांनी आगार प्रमुख यांना दोन ते तीन वेळेस अर्ज , निवेदन देऊनही आज पर्यंत काही फरक केली नाही माध्यमिक शाळेचे 95 विद्यार्थी पासधारक आहेत व 20 विद्यार्थी टिकिटाने प्रवास करीत आहे. तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे या शाळेचे 25 पास धारक आहे . असे सर्व विद्यार्थी जवळपास 150 आहे यांना येताना फार कसरत करावी लागत आहे मा.आगार प्रमुखांनी या मार्गाने शाळेच्या वेळेवर दोन बस सुरू कराव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक वर्ग तथा नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *