स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकांची आत्महत्या
गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव परिसरात हळहळ
गेवराई : दि २० ( वार्ताहार ) स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. सदरील युवक हा गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील असून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदरील घटनेने सुशीवडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील सुशी येथील युवक आकाश बंडू पौळ (वय २३) वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील गावाकडे शेती करतात. काही दिवसांपासून हा तरुण महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन बीड शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. दरम्यान गुरुवार दि.२० जुलै रोजी सकाळच्या सुमारास त्याने बीड शहरातील भाड्याने राहत असलेल्या रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या का केली असावी याची माहिती मात्र उशिरापर्यंत समजू शकली नाही. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा करून, त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सुशी येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...