गेवराई दि २० ( वार्ताहार ) गेवराई बसस्थानक परिसरात बसमध्ये एका एसटी चालकाने महिलेची छेड काढली यावरूण महिलेच्या दिराने चालकाला मारहान केली तसेच चालकाने देखील एका मुलाला मारहान केल्याची घटना ( दि २० रोजी ) दूपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , एम एच २० बी एल ३८५० ही बस गेवराई आगारातून पुणे याठिकाणी चालली होती तसेच महिला व तिचा दिर आणि सासरा व अन्य एक महिला बसमध्ये चढल्या तसेच बस चालक यांने सामान कॅबिनमध्ये ठेवले म्हणून सदर महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करून छेड काढली म्हणून महिलेच्या दिराने या बसचालकाला चोप दिला सर्व एसटी महामंडळातील कर्मचारी यांनी गेवराई पोलिसांत धाव घेतली आहे या प्रकरणी अद्याप गून्हा दाखल झाला नव्हता परंतू या बस चालकाशी संपर्क केला असता त्याने आपल्याला विनाकरण मारहान झाली असल्याचे सांगितले तसेच याठिकाणी जानाऱ्या महिलेचे म्हणने आहे मला अश्लील भाषेत एस टी चालकांने शिवीगाळ केली व छेड काढल्याने माझ्यादिराने त्याला मारहान केली तसेच सदरच्या चालकाने व त्यांच्या सहकारी यांनी देखील मारहान केल्याचा आरोप या महिलेने केला आहे .