
गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का
गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का
बाळासाहेब मस्के, मयुरी खेडकर-मस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्ते करणार बी.आर.एस. पक्षात प्रवेश
गेवराई : दि १६ ( वार्ताहार ) शेतकऱ्यांचे सरकार म्हणून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पक्षाचे लोकप्रिय पक्षप्रमुख के. चंद्रशेखरराव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेते, बीएम प्रतिष्ठानचे संचालक बाळासाहेब मस्के, मयुरी खेडकर-मस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बी.आर.एस. पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, मस्के-खेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेने गेवराईच्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून, मस्के-खेडकर यांची भूमिका तालुक्यातील राष्ट्रवादीला दे धक्का मानली जात आहे.
दरम्यान या बी.आर.एस. पक्षात गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के, मयुरी खेडकर-मस्के यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते रविवारी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात प्रवेश करणार आहेत. यामुळे गेवराईतील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असून राष्ट्रवादी ला हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे. दरम्यान बाळासाहेब मस्के यांच्या बीआरएस पक्षातील प्रवेशाने गेवराईतील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल अशी शक्यता देखील राजकीय जानकारांमधून व्यक्त केली जात आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका करत महाराष्ट्रात परिवर्तनाची हाक दिली आहे. ‘अबकी बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत बंगारु तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे त्यांनी जाहिर केले असून त्यांना महाराष्ट्र राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद, लोकसभा व राज्यसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बीएसआर पक्षाची वाटचाल सुरु आहे. दरम्यान या पक्षात गेवराईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा बी.एम. प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के व मयुरी खेडकर-मस्के यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते रविवारी आयोजित एका भव्य कार्यक्रमात जाहीर प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशामुळे गेवराईत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे. बाळासाहेब मस्के यांनी रेवकी जिल्हा परिषद गटासह तालुक्यात देखील कार्यकर्त्यांची फळी तयार केलेली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मजुराचा मुलगा असलेल्या बाळासाहेब मस्के यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी लक्षवेधी आंदोलने केली. गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण व त्यांच्या मदतीला दिवस-रात्र धावून जाणारे नेतृत्व म्हणून नावलौकिक आहे, तसेच विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी आपली वेगळी ओळख तालुक्यातील राजकारणात निर्माण केलेली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या अत्यंत जवळचे व पक्षातील पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेऊन बी.आर.एस. पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. रविवारी गेवराई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात पक्षाचे खासदार बी.बी.पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेब मस्के व मयुरी खेडकर मस्के या प्रवेश करणार आहेत. यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का असून बीआरएस पक्षाला एक युवा नेता मिळाला असून यामुळे गेवराईचे राजकारण तापणार ऐवढं मात्र नक्की आहे.
पंडित-पवारांना पर्याय, विधानसभा लक्ष