वाळू वाहतूक करनाऱ्या दोन ट्रॅक्टरवर उप अधीक्षक पथकाची कार्यवाई
दहा लाखांचा मुद्देमाल जप्त;माफियाचे धाबे दणानले
गेवराई दि १३ ( वार्ताहार ) तालुक्यातील गोदापात्रातून होणाऱ्या अवैध वाळु उपसा विरुद्ध गेवराई चे उपअधीक्षक यांच्या पथका मार्फत धडक कारवाई करत दोन ट्रॅक्टर सह केनी वाळु साठा जप्त करुन वाळु चोरांना दणका देण्यात आला आहे यामध्ये दहा लखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई येथील उप अधीक्षक निरज राजगुरु यांनी अवैध धंदे करणाऱ्यावर धडक मोहिम सुरु केलेली असून त्यानुसार ( दि.१३ जूलै ) रोजी गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदापात्रात अवैध वाळू उतखन्न होत असल्याची माहिती गुप्त बातमी दारामार्फत मिळाल्याने उप अधीक्षक निरज राजगुरु यांनी त्यांच्या पथकातील काही कर्मचारी यांना पाठवून गोदापात्रातून अवैध उतखन्न करत असतांना रंगेहाथ दोन ट्रॅक्टर केनी सह वाळु साठा जप्त करत धडाकेबाज कारवाई केली आहे.उप अधीक्षक राजगुरु यांनी अवैध वाळू विरोधात कारवाई करु लागल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धांबे दणानले आहे. तर या प्रकरणी पुढील कारवाईसाठी चकलंबा पोलिस ठाण्यात जप्त वाहने लावण्यात आली आहेत तसेच सदरची कार्ययाई उप अधीक्षक निरज राजगूरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे कॉ अशोक तिपाले ,खटाणे ,पवळ,सुरवसे यांनी केली आहे
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...