गेवराई दि १३ ( वार्ताहार )तालुक्यातील राक्षभूवन परिसरात वाळूसाठा जप्त असल्याचे भासवून त्यांचा लिलाव करूण परत गोदापात्रातून वाळू उपसा करण्याची परवानगी देण्याचा मानस गेवराईचे तहसिदार संदिप खोमणे यांचा आहे तसेच याठिकाणी वाळू देखील नसल्याची माहिती आहे तर लिलाव कश्याचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन तसेच बोरगांव ( बू ) असे दोन्ही ठिकाणी मिळून ४५५ ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलाव करण्याचा डाव गेवराई तहसिलदार यांचा आहे परंतू याची जाहिरात आणि सदर ठिकाणी वाळू साठा नाही अशी तक्रार गेल्यानंतर आज ( दि १३ जूलै ) रोजी यांची जाहिरात एका स्थानिक वृत्तमान पत्रात आली आहे तसेच याठिकाणी वाळू नाही हे माहित असतांना देखील तहसिलदार यांनी केवळ आपला खिसा गरम करण्यासाठी सदरचा वाळू साठ्याचा लिलाव उद्या ( दि १४ जूलै ) रोजी ठेवण्यात आला आहे तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून सदरचा लिलाव रद्द करावा अशी मागणी होऊ लागली आहे .तसेच या प्ररकरणी गेवराईचे तहसिलदार यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...