गेवराई दि 3 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात मोठ्या प्रमाणात विना परवाना वाळू उपसा करूण त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती महसुल व साहय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती त्यावरून आज ( दि 3 रोजी ) राक्षसभूवन याठिकाणी छापा टाकला व जवळपास एक कोटी चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सहा जणांना ताब्यात घेण्यात आला आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , राक्षसभूवन परिसरात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राक्षसभूवन परिसरात छापा टाकला यावेळी दोन हायवा , एक ट्रॅक्टर , एक सिव्हिट डिजायर , एक स्कॉर्पियो , तिन मोटार सायकल सह लोकेशन करणारे सहाजण ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे सर्व मुद्देमाल व आरोपी गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत सदरची कार्यवाई बीड तहसिलदार आदित्य जिवणे , साहय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत , नायब तहसिदार सुहास हजारे , मंडळ अधिकारी काशीद , बालाजी दराडे , यांच्यासह अनेकजण या कार्यवाईत सहभागी होते .
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...