January 22, 2025

मनोहर भीडे व गुणरत्न सदावर्तेवर सरकार कधी गुन्हे करणारॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड दि 30 ( वार्ताहार ) देशभर लोकांना राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या भाजपाने अगोदर हे स्पष्ट करावे की राष्ट्रपिता महात्मा गाँधी यांची हत्या करणारा देशाचा पहिला अतिरेकी नथुराम गोडसे स्वातंत्रवीर होता का? देशाचा पहिला आतंकवादी होता? हे जनतेला सांगावे असा प्रश्न भाजपाला व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी देशाच्या जनतेकडून केला आहे.

कारण काही, दिवसापासून भाजपा समर्थक गुणरत्न सदावर्ते हा देशद्रोही व्यक्ति आतंकवादी नथुराम गोडसेचे गुणगान गाताना अनेक कार्यक्रमातुन आपल्याला दिसत आहे दुसरीकडे आपल्याला मनोहर भीडे नावाचा देशद्रोही पहावयास मिळत आहे चक्क तो चैनलच्या माध्यमाने सांगतो की मला भारताचा तिरंगा झेंडा मान्य नाही, मी भारताचा राष्ट्रगीत जन गण मन मानत नाही व मला 15 ऑगस्ट 1947 साली मिळालेले भारतीय स्वातंत्रतादिन पण मान्य नाही महात्मा गाँधी व साईबाबा मान्य नाही. असे फालतू व देश विरोधी वक्तव्य फक्त भाजपाच्या काळातच आपल्याला ऐकु व बघण्यास मिळू शकते अशा देशद्रोहयाकडे भाजपा चक्क डोळेझाक करत आहे हे दोघे देशद्रोही आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील अशा गंभीर विषयाकड़े लक्ष द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते व मनोहर भीडेवर देशद्रोहा सारखे गंभीर गुन्हे दाखल करुन तात्काळ अटक करावी नसता नथुराम गोडसे स्वातंत्रवीर होता का आतंकवादी ?हे भाजपाने स्पष्ट करावे व शिंदे फडणवीस यांनी या वक्तव्याची जबाबदारी घेवून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी देशाची जनता जनार्दन भाजपा सरकारला लोकसेनेच्या माध्यमाने करत आहे. अशा देशद्रोही वक्तव्याकडे डोळेझाक करण्याचे कारण राजकारण व सत्तेसाठी आहे कारण देशात लोकसभा विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका आहे म्हणून हे कारस्थान सुरु आहे शेतकरी प्रश्नी युवा रोजगार व नौकऱ्या महिला रक्षण याकडे लक्ष दिले जात नाही न्यायलयाच्या आदेशाची पायमल्ली केली जाते यामुळे भारताचे लोकतंत्र संविधान धर्मनिरपेक्षता समता धोक्यात आल्याची खंत लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी व्यक व्यक्त केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *