January 22, 2025

रक्तदान शिबीरासह विविध समाजपयोगी उपक्रमाने
अमरसिंह पंडित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

गेवराई  दि.31( वार्ताहार )  शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शारदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दिलीप महाराज घोगे, जयसिंग पंडित सह मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांगांना व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. दाभाडे गल्ली येथे ह.भ.प. कल्याण महाराज देवडकर यांचा एक दिवसीय किर्तन सोहळा आणि नारायणगड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. गेवराई शहराचे ग्रामदैवत असलेल्या चिंतेश्वर मंदिरात अमरसिंह पंडित यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी ५१ जोडप्यांच्या शुभहस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. यासह विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेवराई शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. गेवराई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शारदा प्रतिष्ठानच्या वतीने संदिप मडके आणि दत्ता पिसाळ यांच्या पुढाकारातुन शहरातील र.भ. अट्टल महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. रक्तदात्यांनी उत्सर्फुत सहभाग नोंदविला. जयभवानी कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंग पंडित, चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प दिलीप महाराज घोगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शहराध्यक्ष दिपक आतकरे, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादीचे युवानेते पृथ्वीराज पंडित यांनी रक्तदान करुन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे यांच्या पुढाकारातुन सोमनाथ गिरगे, स्वपनिल मोे, विशाल हुंबे, मयुर गव्हाणे आदींच्या माध्यमातुन शामकुवर सुरेशकुमार बाहेती, भागवत गचांडे, रुपली, दत्तात्रय लक्ष्मण काळे, शेख हस्मत अली शेख गणीया गरजू दिव्यांगाना व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. अमरसिंह पंडित यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी गेवराई शहराचे ग्रामदैवत चिंतेश्वर मंदिर येथे ५१ जोडप्यांच्या शुभहस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. गेवराई शहरातील दाभाडे गल्ली येथे छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ, दिपक आतकरे मित्र मंडळ आणि शिवछत्र दुर्गा उत्सव समिती यांच्या माध्यमातुन स्वप्नील कोकाटे, राहुल मोटे, रवी दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, शिवा वाघमारे, आनंद दाभाडे, भागवत परळकर, अदित्य दाभाडे, वैभव दाभाडे, विशाल ठाकुर व शेखर मोटे यांच्या पुढाकारातुन एकदिवसीय किर्तन सोहळ्याचे आयोजन करुन गेवराई ते नारायणगड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. किर्तन सोहळ्यात ह.भ.प. कल्याण महाराज देवडकर यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले. युवकांनी काढलेल्या पायी दिंडीचे स्वागत ठिक-ठिकाणी करण्यात आले. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामात ऊसतोडणी कामगार संजिवनी संतोष जाधव यांचे दुर्देवी अपघाती निधन झाले होते त्यांचे वारस संतोष जाधव यांना ३ लक्ष रुपयांचा तर अपघातामध्ये अपंग झालेल्या रमेश लहु आडे यांना १८९०० रुपयांचा धनादेश माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्या शुभहस्ते चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वाटप करण्यात आला. यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक भाऊसाहेब नाटकर, श्रीराम आरगडे, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांच्या माध्यमातुन शनिवार दि. ३ जुन ते रविवार दि. ४ जुन पर्यंत ६० किलो वजनी गट साहेब चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन शारदा अकॅडमी, जगदंबा आय.टी.आय., गेवराई येथे करण्यात आले आहे. रसुूुुलाबादचे माजी सरपंच पै.दयानंद पांडुळे यांच्या माध्यमातुन चकलांबा येथे रविवार दि. ४ जुन रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. अशा विविध उपक्रमांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *