विद्युत प्रवाह करणारी तार अंगावर पडल्याने चुलता पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू
गेवराई दि 27 ( वार्ताहार ) मन्यारवाडी येथील बांधकाम करत असतांना विद्युत प्रवाह करणारी तार अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला असल्याची घटना ( दि 27 रोजी ) साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , फेरोज ईस्माईल शेख ( वय 40 वर्ष ) समिर जूबेर शेख ( वय 26 वर्ष ) दोघे राहणार संजय नगर गेवराई असे या मयताची नावे आहेत सदरचे दोघे हे नात्याने चुलते पुतणे आहेत तसेच व्यावसायाने बांधकाम मिस्री आहेत नेहमी प्रमाने आज सकाळी ते कामाला गेले होते तालुक्यातील मन्यारवाडीमध्ये बांधकामाचे काम सुरू होते ज्याठिकाणी काम सुरू होते त्याठिकाणी विद्यूत प्रवाह करणारी तार गेली होती काम करत असतांना अचानक ती तार तूटली आणि या दोघांच्या अंगावर पडली यात ते गंभीररीत्या भाजले व तात्काळ त्यांना गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात आनले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे सदरच्या घटनेमुळे संजय नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
सदरच्या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिंक करा