मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार
गेवराई दि 11 ( वार्ताहार ) तालुक्यातील मादळमोही याठिकाणी सारडा जिनिंगवर काम करनाऱ्या एका परप्रांतीय मजूरचा उपचारा अभावी तडफडून मृत्यू झाला असल्याची घटना ( दि 10 मे ) रोजी 8 ते 9 वाजे दरम्यान घडली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , रोशनलाल हंसराज चित्ते ( 50 वर्ष ) वय रा पंजाब हा मादळमोही या ठिकाणी असनाऱ्या सारडा जिनिंगवर मजूरी काम करत होता याने काल दिवसभर जिनिंगमध्ये काम केले परंतू कामावरून सांयकाळी 6 वाजता सुट्टी झाल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले असल्याची माहिती आहे परंतू तय्यत अचानक बिघडल्याने त्याला तात्काळ संबंधीताकडून मादळमोहीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी आनले होते परंतू या ठिकाणी कर्तव्यावर असनारे डॉक्टर उपस्थित नव्हते तब्बल एक तास प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तडफडत होता मात्र उपचारा अभावी या मजूराने तडफडून प्राण सोडले परंतू एकही डॉक्टर आला नाही परंतू सदरच्या मजूरा सोबत काही वेगळे घडले असल्याची माहिती त्यांच्या सोबत असनाऱ्या कामगारांनी स्थानिकांना दिली आहे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या मयत मजूराचे शवविछेदन करण्यात आले असुन त्यांचा भाऊ याला पार्थिव सोपण्यात आले आहे तसेच याठिकाणी कर्तव्यावर असनारे पोलिस कर्मचारी उपस्थित मजूरांना दमदाटी करत असल्याची माहिती आहे .
या प्रकरणात वेगळेच काहीतरी घडले आहे ते पिएम रिपोर्टमध्ये उघड होईल परंतू असा एखाद्या व्यक्तीचा तडफडून मृत्यू होणे व डॉक्टर वेळेवर न येणे हे असंवैधानिक आहे व कर्तव्यात जाणून बूजूण कुसूर करणारे लक्षन आहे म्हणून दोषी डॉक्टर व स्टापवर तात्काळ कार्यवाई करावी अशी मागणी रिपाइं चे जिल्हा सरचिटणीस व माजी सरपंच आनंद सरपते यांनी केली आहे .
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...