January 22, 2025

संताच्या सानिध्यात परमार्थीक आनंद प्राप्त होतो – ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे

श्रीक्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहात हजारो भाविकांची मांदियाळी

सुरळेगावच्या ग्रामस्थांचे भव्यदिव्य नियोजन

                   गेवराई  दि ९ ( वार्ताहार ) 
स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराजांच्या जन्मभूमी सुरळेगाव येथे पुण्यभूमीत ज्ञानयज्ञ सोहळा होत आहे.तरुणांनो संत-महात्म्यांना समजून घ्या त्यांचे संस्कार त्यांचे आचार विचार आत्मसात करा जीवनात यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विचार शक्तिशाली बनविण्यासाठी हा नारळी अखंड हरिनाम रुपी ज्ञानयज्ञ सोहळा होतो.त्यामुळे प्रत्येकाने नित्यनेम ठेवत आपल्या जीवनामध्ये भगवंताचे नामस्मरण करून या आनंद सोहळ्यात आले पाहिजे. सुरळेगावी महात्मा नगद नारायण महाराजांच्या सानिध्यात अनेक चांगली माणसं घडली आहेत.संतांचा महिमा अगाध आहे. संतामुळे चांगले संस्कार प्राप्त होवून सर्वांना परमार्थिक आनंद प्राप्त होतो असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी व्यक्त केले.


गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा वै.नगदनारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वै.ह.भ.प. प.पु. गु.महंत महादेव महाराज यांच्या आशिर्वादाने व श्री.ह.भ.प.परमपूज्य गुरुवर्य महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड) यांच्या शुभहस्ते व श्री.ह.भ.प.संभाजी महाराज (जगदगुरु संत तुकाराम महाराज संस्थान, मादळमोही) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ७१ व्या भव्य वार्षिक नारळी अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी पाचवे कीर्तनरुपी पुष्प गुंफताना ज्ञानेश्वर महाराज तांबे बोलत होते.यावेळी हजारो भाविकांची मांदियाळी याठिकाणी पहावयास मिळाली.

पुढे बोलताना ज्ञानेश्वर महाराज तांबे म्हणाले की, धार्मिक कार्यासाठी दान दिल्याने अनेक वर्षाचे पुण्य प्राप्त होते. प्रत्येकाने ज्ञानयज्ञ सोहळ्यात दानधर्म केले पाहिजे. चांगल्या कामासाठी गती प्राप्त होताच विचारसरणी चांगली होती तरुण मित्रांनो शून्यातून विश्व निर्माण करायचे असल्यास चांगले कार्य करा नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील प्रेममूर्ती महंत शांतीब्रह्म शिवाजी महाराज यांच्यासह नगदनारायण महाराजांच्या भक्तमंडळीच्या सानिध्यात आजची कीर्तन सेवा होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. तसेच क्रोधावर नियंत्रणासाठी राम नामाचा जप करून श्रीराम समजून घेतले पाहिजेत आणि मन शक्तीशाली झाले. तर आपण राम झाल्याशिवाय राहणार नाहीत मनाला बलशाली करावे रामाचे जीवन म्हणजे मुक्तीचे जीवन होय. भगवंत नेहमीच चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभा राहतो तसेच जीवनामध्ये चांगल्या माणसांच्या तसेच संत-महंतांच्या सानिध्यात राहावे त्यामुळे जीवन सार्थकी लागते. संतांच्या छत्रछायेखाली माणसं मोठी होतात आणि त्यांचे आशीर्वाद लाभले तर आपल्या जीवनामध्ये मोठे यश संपादन करुन वैभव प्राप्त होते. नगद नारायण महाराजांची भक्ती भावाने सेवा करा नगद नारायण महाराजाचा नगद प्रसाद मिळतोच. तसेच प्रत्येकाने चांगला आहार घेवून वाद विवादापासून दूर रहा असा मौलिक सल्लाही शेवटी बोलताना दिला. यावेळी पंचक्रोशीतील वारकऱ्यांसह महिल व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *