April 19, 2025

डीसीसी बँकेने लोकांना आर्थिक भुर्दंड देऊन दिलेले एटीएम तात्काळ सुरु करावेत – राजेंद्र मोटे


गेवराई दि 7 ( वार्ताहार ) सध्या लोकांना सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे अनुदान खात्यावर जमा झाले आहेत परंतु डिसिसी बँक शेतकऱ्यांना हक्काचे पैसे तात्काळ मिळवण्याचे माध्यम असलेले एटीएम कार्ड बंद केले आहेत. ते तात्काळ सुरु करावे अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी बँक प्रशसानाकडे केली आहे.

निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान म्हणणाऱ्या सरकारने सप्टेंबर मध्ये झलेल्या अतिवृष्टीच्या अनुदान याद्या तयार करायला एप्रिल महिना लावला कसे बसे मनसे आणी शेतकरी संघटनांच्या रेट्याने अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले. परंतु जास्त खाते डिसिसीला असल्याने तसेच आधार कार्ड लिंक डिसिसी बँकेला असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे या बँकेत गेले आहेत. मात्र या बँकेने पूर्वी जसे शेतकऱ्याच्या अनुदानावर स्वतःचा फायदा करून घेत तब्बल 6 ते 7 महिने पैसे वापरले आणि आता परत शेतकऱ्यांना या उद्या या परवा अशा प्रकारे काम धंदे बुडूवन चकरा माराव्या लागत आहेत .लाईन मध्ये उभे राहून येनवेळी कॅश नाही असा त्रास सहन करावा लागत आहेत तसेच मागील वर्षी सर्व खातेदारांना एटीएम सक्ती केली. प्रति खातेदार 118 रुपये घेतले आणी आता पुन्हा पैसे वापरण्यासाठी बँकेने एटीएम बंद केले आहेत जे की पूर्णपणे अन्यायकारक आहे. तेव्हा बॅंकेचा असा मनमानी कारभार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नसून शेतकऱ्यांना त्रास होऊ देणार नाही त्यामुळे बँकेने सर्व बंद केलेले एटीएम तात्काळ सुरु करावेत अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केली आसून ही मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *