मंडळ अधिकारी ठोंबरे तलाठी प्रभु येवले सह अनिकेत अट्टल यांना उच्च न्यायालयाचे नोटीसा बजावण्याचे आदेश
गेवराई. दि.6 ( वार्ताहर ) गेवराई तहसिल कार्यालयाअंतर्गत सेवेत असलेल्या तत्कालीन मंडल निरक्षक श्रीकिसन ठोंबरे, तलाठी प्रभु ज्ञानोबा येवले यांच्यासह अनिकेत राधेश्याम अट्टल यांच्यावर बेकायदेशररित्या फेरफार नोंद करुन विजया संदेश पोतदार यांना बाग पिंपळगाव येथील गट क्र. १६७ आणि १६८ या मालमत्तांमधुन बेदखल केल्याच्या प्रकरणांत मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीसी बजावून हजर होण्यासाठी आदेश दिले. फौजदारी रिट याचिका क्र. २७६/२०२३ संदेश शिवाजीराव पोतदार विरुध्द शासन या प्रकरणात दि. ०५/०४/२०२३ रोजी सदरचा आदेश दिला.
याबाबद अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील गर्भश्रीमंत तसेच साधारण १९४० सालापासून सावकारी करणारे अट्टल कुटुंबीयांनी खोटी, बनावट, बोगस आणि चुक कागदपत्रे तयार करुन पोतदार कुटुंबीयांची मालमत्ता मंडल अधिकारी श्रीकिसन ठोंबरे आणि तलाठी प्रभु ज्ञानोबा येवले यांच्यावर अनैतिक, बेकायदेशीर आणि भ्रष्टमार्गाने दबाव आणि दडपण आणून अनिकेत राधेश्याम अट्टल याच्या नावे करण्यास भाग पाडले.
याबाबत संदेश पोतदार यांनी गेवराई येथील न्यायदंडधिकारी कोर्टात वरील आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली की, सदरी मालमत्ता जयप्रकाश ना. सह. पतसंस्थेस कर्जास तारण असताना, तशा बोजाची नोंद सातबारा उताऱ्यावर आणि महसूल रेकॉर्डवर असुनही या मालमत्तेबाबत कर्ज भरणा झाला आहे किंवा कसे याविषयी काहीही खातरजमा, शहानिशा न करता, कर्जभरणा विषयी, अगर बोजा उतरणे बाबत पत्राशिवाय फेरफार क्र. १०४६, १०४७ आणि १०४८ मंजुर करुन दखलपात्र गुन्हा केला. हा गुन्हा आरोपींनी सदरचे फेरफार रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या बाबत असलेल्या आक्षेप दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी मंजुर करुनही गुन्हा केला. आरोपींचे हे कृत्त्य भा. दं. वि. कलम ४२० सह अन्य कलमनुसार गुन्हा ठरत असल्याने या बाबत तक्रार दाखल केली होती गेवराई येथील न्यायालयाने तक्रार फेटाळल्याने संदेश पोतदार यांनी बीड येथील न्यायालयात आव्हान दिले. बीड जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर संदेश पोतदार यांनी या प्रकरणी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली. ०५/०४/२०२३ रोजी मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मा. न्या. किशोर संत यांच्या खंडपीठाने या प्रकरणाबाबत सुनावणीअंती आरोपींना नोटीसा बजावण्याचा आदेश देत तक्रारदारास मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी संदेश पोतदार यांच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एड. एकलव्य संदेश पोतदार यांनी काम पाहिले.
मराठवाड्यातील 'या' आमदारांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; इच्छुकांची लॉबिंगही सुरु मराठवाड्यात शिवसेनेचे 12 आमदार असून, त्यापैकी नऊ आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ...