January 22, 2025

कर्जतच्या राज्यस्तरीय मेळाव्याला बीड जिल्ह्यातील
200 पत्रकार उपस्थित राहणार – दिनकर शिंदे

गेवराई दि 5 ( वार्ताहार ) मराठी पत्रकार परिषदेच्या दिनांक 7 एप्रिल रोजी कर्जत येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मेळावा आणि पत्रकार संघ पुरस्कार सोहळ्यास बीड जिल्ह्यातील प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाचे जवळपास 150 पत्रकार उपस्थित राहणार असल्याची माहिती, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांनी दिली आहे.

डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जिल्हा अहमदनगर येथे 7 एप्रिल रोजी होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यास, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खा संजय राऊत हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. अत्यंत नियोजनबद्ध होणाऱ्या या मेळाव्याचे आ रोहित पवार हे स्वागताध्यक्ष आहेत.
राज्यातील वर्तमानपत्र व पत्रकारांचे विविध प्रश्न, योजना आणि मागण्या या शासन स्तरावर मांडून, त्या सोडून घेण्याबाबत या मेळाव्यात चर्चा होते. त्यासोबतच भविष्यात पत्रकारांसमोर उभा राहणारी आव्हाने आणि त्याला सामोरे जाण्यासाठी प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाची भूमिका काय असावी याचे सखोल मार्गदर्शन तज्ञ आणि जेष्ठ पत्रकारांमार्फत करण्यात येते.

राज्यस्तरीय मेळावा यशस्वी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्यासाठी मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन, विभागीय समन्वयक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, कार्याध्यक्ष सतीश बियाणी, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट, परिषदेचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बरकसे, उपजिल्हाध्यक्ष रवी उबाळे, गौतम बचुटे, संजय रानभरे, दिलीप झगडे, सय्यद शाकीर, अविनाश कदम, जुनेद बागवान, चंद्रकांत राजहंस, डिजिटल मीडियाचे संग्राम धवणे, प्रतीक कांबळे यांच्यासह जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी आणि सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी गेल्या 15 दिवसापासून करत असलेले नियोजन पूर्ण झाले असून, या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातील प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाचे जवळपास 200 पत्रकार उपस्थित राहणार आहेत. यात अनेक संपादक, कार्यकारी संपादक, विभागीय व जिल्हा प्रतिनिधी यांचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *