विषारी द्रव्य पिऊन सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या; मृत्यू प्रकरणी तिघा विरोधात गुन्हा

                 बीड दि २७ ( वार्ताहार )
गेवराई येथील मुळ रहीवासी तसेच व्यापारासाठी पुणे वाघोली येथील सराफा व्यापारी यांनी सोने खरेदी विक्रीच्या व्यवहारातून विषारीद्रव्य प्राषन करूण आत्महत्या केल्याची घटना ( दि २६ रोजी ) करंजी ता पार्थडी बसस्थानकात घडली तसेच मयताचा भाऊ यांच्या फिर्यादी वरूण तिघा विरोधात पार्थडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , नितीन अर्जूनराव उदावंत ( वय ३५ वर्ष ) राहणार वाघोली पुणे असे मयत सराफा व्यापाऱ्याचे नाव असुन पार्थडी येथील दोन व्यक्तीकडे त्यांचे दोन लाख रुपये होते तसेच ती सोने खरेदीची उधारी होती गेवराई येथील एकाच्या मध्यस्थिने हा व्यवहार करण्यात आला होता परंतू आरोपी हे नेहमी पैसे मागितल्यास मयतास गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत असेत ( दि २६ रोजी ) मयत हे सदरचे उधारी वसुली करण्यासाठी गेले होते परंतू त्याठिकाणी त्यांना शवीगाळ करूण आपमानित केले असल्याने तसेच दमदाटी केल्यानं आत्महत्या करण्यास भाग पाडले व त्या नैराशातून त्यांनी विषारी द्रव्य प्राषन करून बसमध्ये बसवले तसेच बस करंजी बसस्थानकात पोहचताच वरील सराफा व्यापारी यांची हालचाल वेगळी वाटत होती तसेच बसचालक व कंनडाक्टर यांनी सदरची माहीती पार्थडी स्थानिक पोलिसांना दिली तात्काळ त्यांना पार्थडीच्या सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले व डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले मयताचे भाऊ किरण अर्जूनराव उदावंत ( वय ३२ वर्ष ) राहणार गेवराई यांच्या फिर्यादीवरून ओम छगनराव टाक ,प्रशांत छगनराव टाक दोघे राहणार पार्थडी व निलेश सुधाकर माळवे राहणार गेवराई यांच्याविरूद्ध पार्थडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ हे करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *