- राज्य शासनाकडून बंदिस्त सभागृहे व मोकळ्या जागेत
सांस्कृतीक कार्यक्रमास परवानगी ; कलाविष्कारकडून स्वागत - गेवराई ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून राज्यात बंद असलेले बंदिस्त सभागृहे व मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रम राज्य शासनाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हाभरातील कलावंतांनी आनंद व्यक्त केला तर गेवराईत कलाविष्कार प्रतिष्ठानकडून या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले.
- राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने कोविड 19 च्या अनुषंगाने दि 23 नोव्हेंबर 2021 रोजी, सांस्कृतीक कार्य व पर्यटन विभागाने बंदिस्त सभागृहे व मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी मागणी राज्यातील विविध ठिकाणी कलावंतांकडून करण्यात आली होती. त्यासोबतच मराठी तमाशा लोककलावंत परिषद महाराष्ट्र यांनी तमाशा, शाहिरी, भारुड , आदी लोककलांना कार्यक्रम सादर करण्यास परवानगी मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणले होते. या सर्व बाबींची आणि कोरोनाचा रुग्ण संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना अखेर परवानगी दिली आहे. यात सर्व सांस्कृतीक कार्यक्रम व लोककला ( उदा . तमाशा , दशावतार भारुड शाहिरी इ . सारखे कार्यक्रम सादर करण्यास तसेच टुरींग टॉकीज ( फिरते सिनेमागृह ) ला कोविड १९ प्रतिबंध विषयक निर्गमीत झालेल्या सर्व आदेशांचे पालन करण्याच्या अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे . त्याअनुषंगाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच ाज्यातल्या सर्व जिल्हाधिकार्यांना सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरुन सुचना देण्याची विनंती अ स क तरी अवर सचिव महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग यांनी केली आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व कलावंतांनी व रसिकांनी आनंद व्यक्त केला तर गेवराईत कलाविष्कार प्रतिष्ठान च्या वतीने कार्यवाहक दिनकर शिंदे, सचिव सौ आशाताई शिंदे, एकनाथ लाड, नारायण झेंडेकर, शिवप्रसाद आडाळे, संतोष कोठेकर, गणेश मिटकरी, गजानन चौकटे, सचिन पुणेकर, सौ सीता महासाहेब, सौ स्वाती कोठेकर, सौ ज्योती झेंडेकर, सौ रोहिणी आडाळे, सौ रेणुका मिटकरी, सौ प्रियंका पुणेकर आदींनी पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले आहे.