गेवराई दि 6 ( वार्ताहार )
बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज दहावीचा इंग्रजीचा पेपर आहे. गेवराई येथील महात्मा फुले विद्यालयामध्ये कॉपी करताना दोन विद्यार्थी रेस्टिकेट करून केंद्रसंचालक आणि वर्ग पर्यवेक्षकांना नोटीस देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकार्यांनी सांगितले
याबाबद सविस्तर माहिती अशी की ,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाचे एक भरारी पथक नियुक्त आहे. गेवराई तालुक्यात हे पथक कर्तव्यावर असताना महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थी कॉपी करताना निदर्शनास आले. एकवेळेस त्यांनी सूचना देऊन दुसर्या वर्गावरही तपासणीसाठी आपला मोर्चा वळविला असता त्याही वर्गात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळून आले. दोन विद्यार्थ्यांकडे कॉप्या आढळून आल्याने या पेपरला रेस्टिकेट केले असून या प्रकरणी केंद्र संचालक आणि वर्ग पर्यवेक्षकांना नोटीस देण्यात येणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.