गेवराई दि 6 ( वार्ताहार ) गेल्या तिन दिवसापुर्वी रोजी फिर्यादी नामे परमेश्वर मारोती कानगुडे ( वय 47 वर्षे ) रा. सरस्वती कॉलनी गेवराई ता. गेवराई जि.बीड यांनी गेवराई पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दिनांक 03/03/2023 रोजी दुपारी 01.15 ते 02.40 वाजण्याचे दरम्याण त्यांचे घर बंद असतांना घरी कुणीही नसतांना घराचे जिण्यामधुन घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने घरामधील कपाटातील सोन्याचे 03 ग्रॅमचे कानातील झुंबर, 02 ग्रॅम चे दोन मनी व एक डोरले असे एकुण 05 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व सुटकेस मधील नगदी रक्कम 60,000/- रु. असे एकुण 72,500/- रुपये चा ऐवज चोरुन नेला वगैरे फिर्याद दिले वरुन पो.स्टे. ला गुरनं. 89/2023 कलम 454,380 भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबद सविसतर माहिती अशी की ,सदर घरफोडीचे अनुषंगाने अज्ञात आरोपी बाबत घटनास्थळावर काही एक माहीती, क्लीव्ह, नसतांना अथक परिश्रम घेवुन परीसरातुन आरोपीची माहीती हस्तगत करता अज्ञात आरोपी हा अल्पवयीन बालक असल्याचे निष्पन्न झाले वरुन आज ( दि 6 रोजी ) सापळा रचुन अल्पवयीन आरोपी बालकास निकम गल्ली गेवराई येथुन ताब्यात घेतले असता या बालकाने गुन्ह्याची कबुली दिली असुन गुन्ह्यातील गेला माल नगदी रक्कम 60,000/- रुपये व 05 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असे एकुण 72,500/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक श्री.धनंजय फराटे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री. जंजाळ, पोउपनि श्री. थोटे, पोलीस नाईक नितीन राठोड, पोशि/ एकनाथ कावळे, पोशि/ जितेंद्र ओव्हाळ यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि थोटे हे करीत आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...