शहरात नगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना ( ठाकरे ) गटाचे प्रमुख कार्यकर्ते तसेच माजीमंत्री बदामराव पंडित गटातील सक्रीय नेते माधव बेदरे व सय्यद माजेद यांनी आपल्या अंसख्य कार्यकर्त्या समवेत भाजपाचे आ लक्ष्मण पवार यांच्या नेतृवावर विश्वास ठेऊन भारतिय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे .
नगर पालिका निवडणूकीत गेवराईत भाजपाचे स्थानिक आ लक्ष्मण पवार यांची गेल्या कित्येक वर्षापासुन नगर पालिकेवर सत्ता आहे शहरात झालेला विकास पाहता नगर पालिका निवडणूकीत पवार कुटूंबियांच्या हाती पुन्हा सत्ता येईल .असा दृढ विश्वास गेवराई शहरातील कार्यकर्ते यांना आहे तसेच शहरातील जायकवाडी वसाहत तसेच तय्यब नगर भागात गेल्या विस वर्षापासुन माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या सोबत काम करनारे हे दोन नेते आहे तसेच गत नगरपालिका निवडणूकीत त्यांनी निवडणूकही लढवली मात्र यात यश आले नाही व आता गेवराईचे आ लक्ष्मण पवार यांच्या नेतृवावर विश्वास ठेऊन या दोन नेत्यानी भारतिय जनता पक्षात प्रवेश केला आहे तसेच या सर्व कार्यकर्ते याचं स्वागत भाजपाचे आ लक्ष्मण पवार यांनी केले आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...